एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून त्यानं केली आत्महत्या, नागपुरात प्रचंड खळबळ

0
नागपूर : नागपूर येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील शहरातील तहसील पोलीस स्टेशनच्या परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या पाच जणांची हत्या केल्यानंतर एकाने स्वतः आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागपूर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अधिक माहितीनुसार, नागपूर येथील तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही एक धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (21 जून) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. अलोक माटूळकर असं त्या हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

माटूळकर यांने आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. त्या पाच जणांची हत्या करून अलोकने स्वतः आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.