हार्ट पेशंटवर उपचार करताना डॉक्टरलाच हृदयविकाराचा झटका

0

हैद्राबाद : हैद्राबादमधील एका रुग्णालयात हार्ट पेशंटवर उपचार करीत असताना एका डॉक्टरला हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात डॉक्टरचा रुग्णालयातच मृत्यू झाला. ज्या रुग्णावर डॉक्टर उपचार करीत होते, त्याचाही काही वेळानंतर मृत्यू झाला. डॉक्टरचं वय अवघे 40 वर्षे असल्याचं सांगितलं जात आहे.

हैद्राबादमधील गुजाला भागात राहणारा 60 वर्षीय जगिया नाईक यांना रविवारी सकाळी हार्ट अटॅक आला होता. त्यांना उपचारासाठी गांभारी मंडलच्या एसवी श्रीजी नर्सिंग होम येथे आणण्यात आलं. रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये डॉ. लक्ष्मण त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पोहोचले. डॉ. लक्ष्मण रुग्णावर उपचार करीत होते, तेवढ्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले.

*उपचार न मिळाल्याने रुग्णानेही सोडला जीव*

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉ. लक्ष्मण यांना सहकाऱ्यांना आपात्कालीन उपचार दिले. मात्र त्यांना वाचवता आलं नाही. यानंतर रुग्णालयातील कर्मचारी त्यांचा मृतदेह आयसीयूच्या बाहेर घेऊन आले.

यादरम्यान उपचार घेत असलेले नाईक यांची प्रकृती बिघडली. रुग्णाचे कुटुंबीय त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र दुसऱ्या रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.