राज्यातील काही भागांत पुन्हा उष्णतेची लाट

0

मुंबई : मार्च महिन्यापासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठला आणि यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. उष्णतेचा हा वाढता पारा अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यातच राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊसही पडत आहे. कधी कडाक्याचे ऊन तर कधी अवकाळी पाऊस या विचित्र परिस्थितीमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

याच दरम्यान आता हवामान विभागाने पुढील ३ दिवस काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट तर १० जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २१ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे. २१ एप्रिल ते २३ एप्रिल या काळात काही ठिकाणी हलका पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.