टी-20 विश्व चषकातील ‘हाय व्होल्टेज’ भारत-पाक सामना आज

0

मेलबर्न : यंदाच्या टी-20 विश्व चषकातील सर्वात मोठा सामना होणार आहे. आज भारत-पाकचे संघ मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर दुपारी 1.30 वाजता एकमेकांविरोधात बाह्या सरसावून उततील, तेव्हा त्यांच्यातील चुरशीच्या लढतीच्या थराराचा 1 लाख प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानावर, तर जवळपास 30 कोटी प्रेक्षक टीव्ही व डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आनंद लुटतील. हवामानाच्या आघाडीवरूनही चांगली बातमी आहे. कालपर्यंत सामन्यादरम्यान पाऊस होण्याी शक्यता 90 टक्के होती. ती आता अवघे 15 टक्के राहिली आहे.

रविवार सकाळच्या हवामान अंदाजानुसार मेलबर्नमध्ये ढगांचे सावट आहे. पण तिथे पाऊस सुरू नाही. दुपारनंतर पाऊस होण्याचीही शक्यता फार कमी आहे.

ऑस्ट्रेलियाच्या MCG स्टेडियममध्ये 37 वर्षांनी भारत-पाकमध्ये सामना होईल. यापूर्वी 1985 मध्ये दोन्ही संघ बेंसन अँड हेजेस विश्व चषकात एकमेकांना भीडले होते. हा सुनील गावस्करच्या नेतृत्वातील शेवटचा मॅच होता. त्यानंतर दोन्ही संघांनी या मैदानावर केव्हाच सामना खेळला नाही.

MCG वरील मागील 5 सामन्यांत धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. या 5 सामन्यांत सर्वात मोठा स्कोअर 175 धावांचा आहे. तो ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरोधात उभा केला होता.

पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 145 आहे. दुसऱ्या डावातील सरकारी स्कोअर 140 आहे. भारताने या मैदानावर एका डावात सर्वाधिक 184 रनांचा विक्रम केला होता. पाकच्या या मैदानावरील सरासरी स्कोअर 125 धावांचा आहे. येथील पिच वेगवान गोलंदाजांना मदत करते. या धावपट्टीवर पेसर्सनी तब्बल 59 विकेट्स आपल्या खिशात घातलेत.

Leave A Reply

Your email address will not be published.