सातारा : सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर अफजल खानच्या कबरी जवळचे अनधिकृत बांधकाम शासनाने काल पडले. या कारवाईवर समाजाच्या सर्व स्थरांवरून प्रतिक्रिया येत आहेत. या कारवाईवर उदयनराजे भोसलेंनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे भोसले म्हणाले, ‘अफझल खानच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवलंच पाहिजे, असं उदयनराजे यांनी सांगितलं. कोणत्याही समाजाला गैरसमज करून घेण्याची गरज नाही’.
ते पुढे म्हणाले, ‘ ही कबर इथे का आहे..?, त्यामागील इतिहास काय? याबाबत भावी पिढीला कळायला हवं’. तसेच पर्यटनासाठी अफजल खानची कबर खुली करायला हवी, कारण त्याशिवाय इतिहास जिवंत राहणार कसा?, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला.
सातारा जिल्हा प्रशासनाने या कारवाई आधी प्रतापगड परिसरात कलम १४४ लागू करून कठोर बंदोबस्त लावला होता. १५०० पोलीस या परिसरात तैनात करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले.