पंढरपूर : पंढरपूर-सांगोला रस्त्यावर झालेल्या भिषण अपघात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 11 जण जखमी झाले आहेत. सर्वच मृत्युमुखी पडलेले आणि जखमी बेळगाव जिल्ह्यातील आहेत.
सखाराम धोंडिबा लांबोर (50), शांताबाई लक्ष्मण लांबोर (62), पिंकी उर्फ सुनीता ज्ञानू लांबोर (11), नगुबाई काळू लांबोर (65 वर्षे , सर्वजण राहणार धनगरवाडी, धामणे, जिल्हा बेळगाव, कर्नाटक ) आणि तुकाराम खंडू कदम ( 50 वर्षे, रा.बादराई कडवळे, ता.चंदगड, जिल्हा. कोल्हापूर ) अशी मृत्युमुखी पडलेल्याची नवे आहेत.
तर धोंडिबा बापू लांबोर, कोंडदेव बापू लांबोर, कोमल बापू लांबोर, बबन लांबोर, भारती बापू लांबोर, रोहित यशवंत कांबळे, बापू कल्लाप्पा लांबोर, कोंडीबा विठ्ठल लांबोर, बाबूलाल लांबोर,नगुबाई ज्ञानू कोकरे आणि धोंडिबा सखाराम डोईफोडे अशी जखमींची नावे आहेत.
ट्रक आणि बोलेरो गाडीचा अपघात शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास कासेगाव हद्दीत झाला. 7 मैल येथे रस्त्यावर उभ्या ट्रक ( G j – 3, w -9355 ) ला समोरून बेळगाव ( कर्नाटक ) येथून आलेली बोलेरो जीप ( क्रमांक K A – 04 , M B – 9476 ) ने जोरदार धडक दिली. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. तर 11 जण जखमी झाले होते.
जखमींवर पंढरपूर येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.
या जीपमध्ये एकूण 16 लोक प्रवास करीत होते.