‘मी पुन्हा येईल म्हंटले कि येतोच; ते कसे माहीतच आहे’

0

कोल्हापूर : मी पुन्हा येईन म्हटले की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्याला कारणही तसेच होते, मी पुन्हा येईन…पुन्हा येईन…अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर व्हावे लागले होते. आणि या वाक्यावरुन विरोधकांनी त्यांची भरपूर खिल्ली उडवली होती.

बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचले. गुरुवारी सीमाभागात दौऱ्यावर असताना फडणवीस यांची नरसिंह मंदिराला अचानक भेट देवून देवाचे दर्शनही घेतले. यावेळी त्यांनी निट्टूर येथे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याचठिकाणी बोलताना मी पुन्हा येईन म्हटले की येतोच, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

बजरंग दलसारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणे म्हणजे एकप्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. बेळगाव येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस गुरुवारी बेळगाव दौऱ्यावर होते. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या आग्रहाखातर फडणवीसांनी नरसिंह मंदिरात दर्शन घेतले.

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटले की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपले कुलदैवत नरसिंह आहे. आपण कुठूनही प्रगती करतो.

Leave A Reply

Your email address will not be published.