आयसीसी महिला टी-२० चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक सामना

0

नवी दिल्ली : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीचं वेळापत्रक आयसीसीने जाहीर केलं आहे. १० फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारतीय महिलांनी मागच्या स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती.

यंदाच्या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाला दुसऱ्या गटात स्थान देण्यात आलं आहे. या गटात भारतासोबत पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांचाही समावेश आहे. पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश यांचा समावेश असणार आहे.

मागच्या विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया संघ ११ फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळेल. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ पाकिस्तानविरुद्ध १२ फेब्रुवारीला पहिला सामना खेळतील. भारतीय महिलांना मागच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता.

भारतीय महिला संघाच्या सामन्यांचं असं असेल वेळापत्रक –
१२ फेब्रुवारी – भारत विरुद्ध पाकिस्तान – केप टाऊन
१५ फेब्रुवारी – वेस्ट इंडिज विरुद्ध भारत – केप टाऊन
१८ फेब्रुवारी – इंग्लंड विरुद्ध भारत – Gqeberha
२० फेब्रुवारी – आयर्लंड विरुद्ध भारत – Gqeberha

यानंतर २३ आणि २४ फेब्रुवारीला उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाईल तर २६ फेब्रुवारीला अंतिम सामना खेळवला जाईल. हे सर्व सामने केप टाऊनच्या मैदानावर खेळवले जातील. आयसीसीने उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एक दिवस राखीव ठेवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.