‘मी बोललो तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही’

0

मुंबई : भाजपचे नेते आणि कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना दिसून येत आहे. यात मुंबई भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी कोरोना काळात ठाकरे कुटुबांतील सदस्य कुठे दारु पित कोणती जबाबदारी पार पाडत होते, यांचे माझ्याकडे 110 व्हिडिओ आहेत, असा इशारा उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

दरम्यान कंबोज पुढे बोलताना म्हणाले की, बोरीवलीच्या नॅशनल पार्क ते बॉलीवूडच्या दलालाच्या पार्टीपर्यंतच्या सर्व गोष्टी मला माहिती आहेत. मी या गोष्टी जर समोर आणल्या तर कोण तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही, असे म्हणत त्यांनी हातात 4 ते 5 पेनड्राईव्ह असलेला फोटो पोस्ट केला आहे.

भाजपचे नेते मोहित कंबोज म्हणाले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना काळात माझे कुटुंब माझी जवाबदारी म्हणत होते. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील काही जण कुठे दारु पिऊन काय जबाबदारी पार पाडत होते, याचा एक व्हिडिओ मी मागच्या महिन्यात दिला होता. बोरीवली पार्क ते बॉलीवूडच्या दलालाच्या पार्टीपर्यंत असे 110 व्हिडिओ माझ्याकडे आहेत. मग कोण तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही, हे ठरवायला हवे, मी बोलत नाही, काम करतो, मला काही जणांनी थांबवून ठेवले आहे. माझा शब्द आणि तारीख कधीच चुकली नाही हे सर्वांना माहिती आहे, असा इशारा मोहित कंबोज यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.

काहीच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांच्यावरील सर्व गुन्हे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या सर्व चौकशा आता संपल्या आहेत. मोहित कंबोज यांना सीबीआयने अखेर क्लीन चीट दिली आहे. या संदर्भातली माहिती समोर आल्यानंतर मोहित कंबोज यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत समाधान व्यक्त केले. यानंतर मात्र मोहित कंबोज आक्रमक होत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आता याला ठाकरे गटाकडून त्यांना काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहवे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.