अंगावर आले तर शिंगावर घ्या : राज ठाकरे

0

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहे. तेथे ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज त्यांनी खेड येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घ्यायची तयारी ठेवा, असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घ्यायची तयारी ठेवा. तुमच्यासाठी वकिलांची फौज तयार ठेवेन, असे आश्वासन राज ठाकरे यांनी खेड येथे मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले. जसे समोरचे वागतील, तसंच आपण पण वागायचं. त्यांनी हात उचलला तर आपणही हातच उचलला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

लवकरच कोकणात मनसे पक्ष बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. येत्या जानेवारी महिन्यात चिपळूण येथे माझी जाहीर सभा होईल, असं देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.