मुंबई : राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तंग झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ‘हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले,’ असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर केला आहे.
दरम्यान, शिंदे गटांनी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असं नव्या गटाला नाव देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान शिंदे गटापुढे एक नवा पेच निर्माण झाला आहे. कारण, शिवसेनेकडून राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘बाळासाहेबांचे नाव कोणालाही वापरु देऊ नये.’ त्यामुळे शिवसेना मात्र शिंदे गटाबाबत अधिकच आक्रमक होताना दिसत आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अनेक ठरावाला मंजुरीही देण्यात आली आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील महत्वाचे निर्णय –
– निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना (उद्धव ठाकरे), पहिला ठराव पारित.
– बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही, ठरावाला राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजुरी.
– शिवसेनेशी बेईमानी करण्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार ही राष्ट्रीय कार्यकारणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना असतील.
– शिवसेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाची बांधिलकी कायम राहिल.
– उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर कार्यकारिणीचा विश्वास, त्यांना पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार.
– शिवसेनेशी गद्दारी कठोर कारवाई करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांना असेल.
– शिवसेना भवनला सर्वांना जमण्याचे आदेश, शिवसेना भवनजवळ शक्तीप्रदर्शन होणार.