शिंदे सरकारच्या जाहिरातीमुळे ज्ञानात भर : शरद पवार

0

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अभ्यासक्रमातून सावरकरांचे धडे वगळण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी ते पाळले. हे धडे वगळल्याने सामाजिक ऐक्य धोक्यात येणार नाही, हे पाहणे सरकारचे काम आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ते जळगावमध्ये बोलत होते.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, शिंदे सरकारच्या जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. तर गोवा, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नव्हते त्यांनी खोके देऊन या राज्यात सरकार आणले, जनतेने त्यांना राज्यातील सत्तेपासून दूर ठेवले आहे आणि तसाच सूर केंद्राच्या निवडणुकींमध्ये असेल असा विश्वास शरद पवारांनी जळगावमध्ये बोलताना व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिंदे सरकारने केलेल्या जाहिरातीवर जोरदार टीका केली आहे. शिंदे यांच्या जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली आहे, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.

आमचा समज असा होता की हे जे सरकार बनले आहे यामध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे. या जाहिरातीमुळे आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली की, भाजपचे यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांचे आहे. हे महाराष्ट्राला कळवण्याचे ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झाले आहे.

शरद पवार म्हणाले की, भाजपची देशातील अनेक राज्यात सत्ता नाही केवळ 4 ते 5 राज्यात भाजप सत्तेत आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसची सत्ता होती गोव्यात काँग्रेसची सत्ता होती तेथील आमदार फोडून भाजपने सत्ता स्थापन केली आहे. आपल्या राज्यात जसे खोक्यामुळे उद्धव ठाकरेंचे सरकार गेले आणि खोके शब्द फेमस झाला तसाच कार्यक्रम त्यावेळी त्या राज्यामध्ये झाला असा आरोप शरद पवारांनी केला आहे. यातून एकच चित्र दिसते ते म्हणजे राज्याचा विचार करताना जनतेने भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवले आहे, ही जर लोकांची ईच्छा असेल तर देशपातळीवरही मतदार ह्यापेक्षा वेगळा विचार करतील असे मला वाटत नाही असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.

शरद पवार म्हणाले की, लोकांचे मत परिवर्तन होण्यामागे दोन ते 3 गोष्टी आहेत. यात मोठी आश्वासने देऊन लोकांच्या अपेक्षा वाढवायच्या आणि ‘ती’ आश्वासने पूर्ण करायची नाही. शेतीमालाचा भाव दुप्पट करणा असे म्हणून ते आश्वासन पूर्ण न करणे यामुळे देशात भाजप विरोधात वातावरण निर्माण होत आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.