कोरोना विषाणूचे उगमस्थान भारत ; चीनचा कांगावा

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण जग ज्या महामारीतून जात आहे त्या कोरोनाचा विषाणूचा पहिला रुग्ण चीन मध्ये सापडला हे सर्वांना माहीत आहे. तरी देखील चीनने या महामारीचे खापर भारतावर फाेडले असून या विषाणूचे उगमस्थान भारतात असल्याचा शाेध लावला आहे.

चीनच्या ‘अकादमी ऑफ सायन्सेस’च्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे, की भारतात २०१९ मध्ये उन्हाळ्यात आलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेदरम्यान प्राण्यांपासून मानवाला विषाणू संसर्ग झाला असावा. ज्या ठिकाणी विषाणूचे कमी म्युटेशन झाले आहे, तिथे विषाणूचा मूळ स्त्राेत असण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, भारत, बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, इटली, रशिया, झेक प्रजासत्ताक किंवा सर्बियामध्ये विषाणू जन्माला आल्याचे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. भारत आणि बांगलादेश या ठिकाणी कमी म्युटेशन आढळले आहे. त्यामुळे चीनने भारतावर खापर फाेडण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतातून मासे घेऊन आलेल्या एका मोठ्या कंटेयनरमध्ये काेविड १९ विषाणू आढळल्याचा आधारही चीनने दिला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकारांना सांगितले, की चीनमध्ये पहिला रूग्ण आढळला म्हणून चीनमधूनच विषाणूचा प्रसार झाला, असा अर्थ हाेत नाही. तो इथे अन्य देशातूनही आलेला असू शकतो.

 
Leave A Reply

Your email address will not be published.