भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं यश; मीराबाई चानूने जिंकले रौप्य पदक

0
टोकियो : आज टोकियो ऑलिम्पिकचा दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूने 49 किलोग्राम वर्गात एकूण 202 वजनासह रौप्य पदक भारताला मिळवून दिलं आहे. मीराबाई यांच्या यशाने भारताने ऑलिम्पिकमध्ये आपलं खातं उघडलं आहे.
मीराबाई चानू ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी दुसरी वेटलिफ्टर ठरली आहे. यापूर्वी दिग्गज खेळाडू कर्नाम मल्लेश्वरीने 2000 मध्ये सिडनी येथील ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
भारोत्तोलनाच्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू हिने स्नॅचमध्ये ८७ आणि क्लिन व जर्कमध्ये ११५ किलो असे मिळून २०२ किले वजन उचलले आणि रौप्य पदावर नाव कोरले. या गटाच चीनच्या हाओ झी हिने स्नॅचमध्ये ९४ आणि क्लीन व जर्कमध्ये ११६ किलो असे २१० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तर इंडोनेशियाच्या एशाह हिने कांस्यपदक पटकावले.
Leave A Reply

Your email address will not be published.