नागपूर ः ”महाविकास आघाडीचं सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सातत्याने टोचावं लागतं, त्याशिवाय ते पुढेच जात नाही,” असा खोचक टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आघाडीच्या सरकारवर लगावला.
गडकरी पुढे म्हणाले, ”मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांनी दिलेले वचन लक्षात नाही, मुख्यमंत्री पदाचं वचन लक्षात राहते. हे सरकार आहे की तमाशा?”, असा प्रश्न गडकरी यांनी विचारला.