राज्याची विधानसभा ‘कॉमेडी शो’ आहे का ? : सुप्रिया सुळे

0

 

मुंबई : शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात जोरदार भाषण केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हा काय कॉमेडी शो आहे का? ही राज्याची विधानसभा आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री अधिवेशनात महागाईशी संबंधित विषयावर बोलतील अशी अपेक्षा होती. पण टीका आणि इतर गोष्टींवर बोलण्यातच त्यांनी वेळ घालवला. असा खोचक सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. हांडेवाडीतील सुप्रियाताई लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत ‘मविआ’ सरकारची कुंडलीच काढली. रवी राणांच्या पत्नीला आत घातले. कंगना राणावतचे घर तोडले. गिरीश महाजन, नारायण राणे, देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबाची चौकशी लावली. आशिष शेलारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. आपण असे केले. काय? जयंतराव मला माहिती आहे. दादांनाही माहिती आहे. असे प्रकार केले. हे जास्त काळ चालत नसल्याचे शिंदेंनी सुनावले.

आम्हाला महाराष्ट्र द्रोही म्हणता. आमचे सरकार घटनाबाह्य म्हणता. मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारला. घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती, सगळ्या सुविधा तुम्हाला चालतात, हे कसे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण चांगलेच गाजले. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणती गोष्ट मिळाली नाही असे झाले नाही. कोरोना काळात कोणी उपाशी झोपले नाही. इंदापूर तालुक्यातील भांडगावमध्ये दारू बंदी झाली नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिस समोर आंदोलनाला बसणार असल्याचा इशाराही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.