पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही क्षणीaअटक होऊ शकते

0

 

पाकिस्तान : पाकिस्तानचे पोलिस रविवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरी पोहोचले. तोशाखाना प्रकरणात त्यांना केव्हाही अटक होऊ शकते. पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रान यांच्या घरी पोलिस अधिकारी हजर झाले होते. दरम्यान, पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफचे नेते आणि इम्रान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र येण्यास सांगितले आहे. इम्रान खान यांना अटक झाल्यास देशात अराजकता पसरू शकते, असे ते म्हणाले.

फवाद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे – इम्रान खान यांना अटक करण्याचा कोणीतरी प्रयत्न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. मी या अक्षम आणि देशद्रोही सरकारला गांभीर्याने वागण्याचा इशारा देतो. त्यांनी पाकिस्तानला आणखी एका संकटात ढकलू नये. मी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना जुमन पार्कमध्ये पोहोचण्याचे आवाहन करतो.

28 फेब्रुवारी रोजी इस्लामाबाद सत्र न्यायालयाने इम्रान खान यांना सरकारी तिजोरीतून (तोशाखाना) कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू स्वस्तात विकल्याचा आरोप ठेवला होता. यानंतर त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले होते.

निवडणूक आयोगासमोर सत्ताधारी पाकिस्तानी लोकशाही फ्रंटने तोशाखाना (सरकारी तिजोरीत) प्रकरण उचलले. इम्रान खान यांनी आपल्या कार्यकाळात विविध देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची विक्री केल्याचे सांगण्यात आले. इम्रान यांनी निवडणूक आयोगाला सांगितले होते की, त्यांनी या भेटवस्तू तोशाखान्यातून 2.15 कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या, त्याची विक्री केल्यावर 5.8 कोटी रुपये मिळाले. नंतर ही रक्कम 20 कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.