ईशान किशनने सर्वात जलद द्विशतक झळकावले

0

नवी दिल्ली : कर्णधार रोहित शर्माच्या जागी तिसऱ्या वनडे सामन्यात प्लेइंग-11 चा भाग बनलेल्या ईशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक झळकावले आहे. त्याने 126 चेंडूत हा पराक्रम केला आहे. दुखापतग्रस्त कर्णधार रोहित शर्माच्या जागी तिसऱ्या वनडे सामन्यात प्लेइंग-11 चा भाग बनलेल्या ईशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक झळकावले आहे. त्याने 126 चेंडूत हा पराक्रम केला आहे.

माजी कर्णधार विराट कोहलीने आपले 44 वे वनडे शतक पूर्ण केले आहे. कोहलीने 1214 दिवसांनंतर या फॉरमॅटमध्ये शतक केले आहे. त्याने त्याचे शेवटचे शतक 14 ऑगस्ट 2019 रोजी पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावले. त्यानंतर त्याला 25 डावात शतकही करता आले नाही.

इशान आणि विराटच्या खेळीच्या जोरावर भारताने 40 षटकात 3 गडी गमावून 339 धावा केल्या. विराट 112 धावा करून क्रीजवर आहे. तर कर्णधार केएल राहुल त्याला साथ देत आहे. शिखर धवन (3), इशान किशन (210) आणि श्रेयस अय्यर (3) बाद आहेत.

बांगलादेश संघाने पहिले दोन वनडे जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. या सामन्यात क्लीन स्वीप टाळण्याचा भारताचा प्रयत्न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.