आयोध्याला जाण्याची ही योग्य वेळ नव्हती : अनिल देशमुख

0

नागपूर : कोणी अयोध्येला जाण्याला आमचा विरोध नाही, प्रत्येक जण तिथे जाऊ शकतो. पण राज्यात अवकाळी पावसाने कहर केलेला असताना आणि शेतकरी संकटात असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाणे योग्य नाही. त्यांनी अयोध्येला जाण्याची ही योग्य वेळ नव्हती, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी येथे पत्रपरिषदेत केली.

विदर्भ, मराठवाडा व कोकणसह राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गहू, कांदा, मिरची, निंबू, संत्रा च् आंब्याचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. खरीप नंतर रब्बी हंगामही हातचा गेला आहे. अशा परिस्थितीत हवालदिल शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अयोध्येला गेले. अयोध्येला जाण्याबद्दल विरोध नाही. पण, ही वेळ योग्य नव्हती असे देशमुख यांनी सांगितले. नागपुरात रविवार 16 एप्रिल रोजी होणारी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा यशस्वी होईल. तीनही पक्ष यासाठी कामाला लागले आहे, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.

संभाजी नगर येथील सभेचा धसका घेऊन भाजपा नागपूर येथील सभेला विरोध करीत आहे. पण, आम्ही रितसर परवानगी घेतलेली आहे. मैदानात यापूर्वीही अनेक कार्यक्रम झालेले आहे. नीट विचार करूनच सभास्थळ ठरवण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाने केलेल्या आरोपात तथ्य नाही. कोणी आंदोलन केले म्हणून सभा रद्द होणार नाही असे देशमुख यांनी स्पष्ट केले. या सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही घटक पक्षांचे प्रत्येकी दोन नेते बोलणार आहे.

कोरोनाच्या साथीतून सावरणाऱ्या दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांचा विचार करून केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थाची आयात करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रीय पशू व दुग्धमंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कोरोनाच्या साथीतून सावरणाऱ्या दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांचा विचार करून केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थाची आयात करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रीय पशू व दुग्धमंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.