सोमवारच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारच्या अकोल्यातील सभेच्या भाषणातील केवळ एक वाक्य ऐकवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्या भाषणातील २ मिनिटांचा पूर्ण व्हिडिओ ट्वीट करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो ते पूर्ण तुम्ही ऐकलेच नाही. असो. आता ऐका. याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलीकडे अधिक आठवायला लागला. म्हणून म्हणतो, स्क्रिप्ट रायटर बदला,’असेही ते म्हणाले.