TCS मध्ये फ्रेशर्ससह अनुभवींना नोकरीची संधी

0

मुंबई : नामांकित IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) भरती (TCS jobs for Freshers) करण्यासाठी ऑफ-कॅम्पस ड्राइव्हचं (TCS Off Campus Drive) आयोजन करत आहे.

यामध्ये फ्रेशर्ससह अनुभवी उमेदवारांनाही जॉबची संधी (TCS jobs for freshers) मिळणार आहे. 00-01+ वर्षांचा अनुभव असलेले B.E./B.Tech/M.E./M.Tech/MCA/M.Sc उमेदवार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये नोकरी (TCS jobs for Engineers) करण्यास पात्र असणार आहेत. या TCS ऑफ-कॅम्पस हायरिंगमध्ये अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या उमेदवारांना TCS डिजिटलच्या प्रगत ऑफर संधीसाठी पात्र होण्याची संधी मिळणार आहे.

Eligibility Criteria For TCS Off Campus Drive

• 2020 आणि 2021 मध्ये B.E./B.Tech/M.E./M.Tech/MCA/M.Sc उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.

• या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ब्रांचमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

• उमेदवार हे 18-28 वयोगटातील असावेत. याशिवाय, त्यांना दोन वर्षांपर्यंतचा पूर्वीचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

• तुमच्या नोंदणीच्या तारखेनुसार तुमच्यासाठी टेस्ट घेण्यात येणार आहे.

• TCS ऑफ कॅम्पससाठी निवड प्रक्रियेत दोन फेऱ्या असतील.

• लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारे, उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

• लेखी परीक्षा सुरू आहेत. ड्राइव्हसाठी नोंदणीच्या तारखेच्या आधारे तारीख निश्चित केली जाईल.

लेखी चाचणीचे दोन भाग असतील.
भाग A संज्ञानात्मक कौशल्ये तपासेल तर भाग B उमेदवारांच्या प्रोग्रामिंग कौशल्यांची तपासणी करेल. A आणि B भागांचा कालावधी अनुक्रमे 120 आणि 180 मिनिटे आहे. उमेदवारांच्या लेखी परीक्षेचा निकाल TCS iON द्वारे कळविला जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीचा तपशील मिळेल.

अशी करा नोंदणी
TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलवर लॉग इन करा (अधिकृत वेबसाईट – nextstep.tcs.com)
नोंदणी करा आणि TCS ऑफ कॅम्पस भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा
तुम्ही नोंदणीकृत वापरकर्ता असल्यास, कृपया लॉग इन करा आणि अर्ज भरण्यासाठी पुढे जा.
सबमिट केल्यानंतर, कृपया ‘Apply for Drive’ वर क्लिक करा.
तुम्ही नवीन वापरकर्ता असल्यास, कृपया ‘Register Now’ वर क्लिक करा, ‘IT’ म्हणून श्रेणी निवडा आणि तुमचे तपशील भरण्यासाठी पुढे जा. तुमचा अर्ज सबमिट करा आणि “Apply for Drive” वर क्लिक करा. तुमच्या स्टेटसची पुष्टी करण्यासाठी, ‘Track Your Application’ तपासा. स्थिती “Applied for Drive” म्हणून दिसेल.

Leave A Reply

Your email address will not be published.