नोकरीची संधी : 5008 क्लर्क पदासाठी अधिसूचना जारी

0

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने क्लर्क पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. क्लर्क कॅटगरीत ज्युनियर असोसिएटच्या (ग्राहक सहायता आणि विक्री) भरतीसाठी अधिसूचना काढली आहे.

क्लर्क पदांसाठी उमेदवार अर्ज सबमिट करून या संधीचा लाभ घेऊ शकतात. आज म्हणजेच 07 सप्टेंबर 2022 रोजी https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर अर्ज उपलब्ध असणार आहे. एसबीआय क्लर्क पदासाठी अर्ज मिळण्याची प्रक्रिया 20 दिवसांत म्हणजे 27 सप्टेंबर 2022 रोजी बंद होईल.

अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनौ/दिल्ली, महाराष्ट्र/मुंबई मेट्रो, महाराष्ट्र आणि ईशान्येकडील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये 5008 पदे भरणार आहे. लखनौ आणि भोपाळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदे आहेत. एसबीआय क्लर्क 2022 साठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेसाठी बोलावले जाईल, जी नोव्हेंबर 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे.

वयोमर्यादा
वयोमर्यादेबद्दल बोलायचे तर या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा 28 वर्षे ठेवण्यात आली आहे.

अर्ज शुल्क
SC/ST/PwBD/ESM/DESM कॅटगरीतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागत नाही. तरGeneral/ OBC/ EWS कॅटगरीतील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

अर्ज कसा करावा?
– या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पहिल्यांदा अधिकृत वेबसाइट https://bank.sbi/careers वर जाऊ शकतात.
– येथे तुम्हाला ‘RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) (Apply Online from 07.09.2022 TO 27.09.2022) (Advertisement No: CRPD/CR/2022-23/15)’under Current Openings’ वर क्लिक करा.
– आता तुमच्यासमोर अॅप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म पूर्णपणे भरा.
– एकदा अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला डेटा सबमिट करावा लागेल.
– अॅप्लिकेशन फॉर्मच्या अचूकतेची खात्री केल्यानंतर, स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या सूचनांचे पालन करून, तुम्हाला अर्जासह पेमेंट गेटवेद्वारे शुल्क भरावे लागेल.
– शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा.

Leave A Reply

Your email address will not be published.