महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा कालीचरण महाराज अटकेत

0

भोपाळ : धर्मसंसदेत कालीचरण महाराजने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह भाषेत विधाने केली. त्यांनतर देशभरात संतापाची लाट उसळली असून त्याच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील खजुराहो येथून कालिचरण महाराज याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये दोन दिवसीय धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी परमात्मानंद, संत रामप्रिया दास, संत त्रिवेणी दास, हनुमान गढी अयोध्येचे महंत रामदास, साध्वी विभा देवी, जुना आखाड्याचे स्वामी प्रबोधानंद यांसह अनेक संतांनी हजेरी लावली होती अकोल्याचे कालीचरण हेही उपस्थित होते.

या धर्म संसदेत कालीचरण महाराजने महात्मा गांधींना अपशब्दांची लाखोली वाहिली होती. यावेळी त्याने खालच्या दर्जाचे असे शब्द वापरले आहेत. त्याच्या विधानांमुळे वाद पेटला होता. केवळ गांधीजींच नव्हे तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेचेही त्याने आभार मानले होते. त्याच्या कृतीचं चक्क कौतुक केलं होतं. त्यामुळे देशात संतापाची लाट उसळली होती.

रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर  पोलिसांनी कालीचरण महाराजांविरोधात टिकरापारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.