कर्जत नगरपंचायत ! रोहित पवार यांनी बाजी मारली

0

कर्जत : नगरपंचायतीसाठी सुरू असलेली मतमोजणी पुर्ण होत आली असून आतापर्यतच्या निकालानुसार राष्ट्रवादी, कॉग्रेस व मित्रपक्षांनी एकुण 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर होती. मात्र, रोहित पवार यांनी राम शिंदेंना कात्रजचा घाट दाखवत कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

आज सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीलाच कर्जत नगरपंचायतीचा निकाल लागला आहे. त्यात राष्ट्रवादीला 17 पैकी 12 जागा मिळाल्या असून भाजपला दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

कर्जत नगरपंचायतीवर भाजपची सत्ता येईल, असा विश्वास माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला होता मात्र तो फोल ठरला असून पुन्हा एकदा मतदारसंघावर रोहित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व आले आहे.

आ. रोहित पवार व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रतिष्ठेची झालेल्या या निवडणुकीत रोहित पवार यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या ताब्यातील नगरपंचायत पवार यांनी हिसकावून घेतल्याची यामुळे चर्चा रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.