कर्नाटक : कर्नाटकात सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत डीके शिवकुमार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 8 आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला राहुल गांधी, प्रियांका गांधी व कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांसह 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांची देखील शपथविधी सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. जी परमेश्वरा, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज आणि एमबी पाटील यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर सतीश जारकीहोली, प्रियांक खरगे (मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र), रामलिंगा रेड्डी आणि जमीर अहमद खान यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.
सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्याला नऊ विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित आहेत. यामध्ये मेहबूबा मुफ्ती (पीडीपी), नितीश कुमार (जेडीयू), तेजस्वी यादव (एआरजेडी), डी राजा आणि सीताराम येचुरी (डावे), एमके स्टॅलिन (डीएमके), शरद पवार (राष्ट्रवादी), फारूख अब्दुल्ला (राष्ट्रीय काँग्रेस), कमल हसन यांचा समावेश आहे. (मक्कल निधि मैयम) आणि शरद पवार (राष्ट्रवादी).