केजरीवाल सरकारने केले बहुमत सिद्ध

0

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आणलेला विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आलाय. भाजप आमदारांच्या गैरहजेरीत 58 ‘आप’ आमदारांनी केजरीवालांच्या समर्थनार्थ मतदान केलं, तर विरोधात एकही मत पडलं नाही.

दिल्ली विधानसभेत ‘आप’नं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. मतांच्या विभाजनातून प्रस्ताव पार पडला. आमदारांना उभं करून मतमोजणी करण्यात आली. यावेळी 59 आमदार उपस्थित होते.

विरोधक सभागृहात उपस्थित नसल्यानं त्यांच्या बाजूनं शून्य मतं पडली. ‘आप’च्या तीन आमदारांपैकी एक आमदार सत्येंद्र जैन तुरुंगात आहेत. विधानसभेचे आणखी एक आमदार राम निवास गोयल हे परदेश दौऱ्यावर आहेत, तर नरेश बाल्यान ऑस्ट्रेलियाला गेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.