राजगुरूनगर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात यायला सुरुवात झाली आहे. त्यातच शिरुर लोकसभेतील डॉ.अमोल कोल्हे आणिशिवाजीराव आढळराव पाटील हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आमनेसामने आले. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी आढळराव पाटलांच्या पायापडून नमस्कार केला. निवडणुका येतात–जातात, पद येतात जातात, पण माणूस टिकला पाहिजे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज राजगुरूनगर तालुक्यातीलप्रचार दौऱ्यावर होते. वाडा गावात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहात डॉ. कोल्हे आणि आढळराव आमनेसामने आले. डॉ. कोल्हे ज्यावेळीसप्ताहात पोहोचले तेव्हा, आढळराव पाटील भाषण करत होते. त्यांचं भाषण ऐकले आणि संपताच कोल्हेंनी पाया पडून त्यांना नमस्कारकरत संवाद साधला.
डॉ. कोल्हे म्हणाले की, वाचा शुद्धी, वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी महत्वाची आहे. निवडणुका येतात जातात, पद येतात जातात, पणत्यातला माणूस टिकला पाहिजे. हीच भगवंतांची शिकवण आहे. संतांनी प्रत्येकाला आत्मभान दिल. जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो, आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्या मध्ये देश लागतो त्यामुळे देशाच्या भवितव्यासाठी मतदान करणे आवश्यकआहे:
एरवी प्रचारादरम्यान, वैयक्तिक एकमेकांवर टीका करणारे अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांनी आज दोघांची भाषण ऐकलं. दरम्यान डॉ. कोल्हे यांनी सप्ताहाच्या महाप्रसादात पंगत वाढली.