राज्यात पुन्हा सुरू होणार कोविड सेंटर

0

मुंबई : देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत 1,805 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शनिवारी 1,890 कोरोना रुग्ण आढळून आले होते आणि 7 मृत्यू झाले होते.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्ण 10,300 पर्यंत वाढले आहेत, ही नोव्हेंबरपासूनची सर्वाधिक रुग्णसंख्या आहेत. यापूर्वी 12 नोव्हेंबर रोजी देशात 11084 सक्रिय रुग्ण नोंदवण्यात आले होते.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथील रुग्णांची वाढ पाहता चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. मुंबईतील काही खासगी रुग्णालयांमध्ये कोविड वॉर्ड सुरू झाले आहेत. त्याचबरोबर सरकारने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना स्टँडबाय मोडमध्ये राहण्यास सांगितले आहे. यासोबतच लोकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात ऑक्टोबरनंतर प्रथमच 2,000 हून अधिक सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 397 नवीन रुग्ण आढळले असून शनिवारच्या तुलनेत ही संख्या 40 ने कमी आहे. शनिवारी राज्यात 437 बाधित आढळले. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

एकट्या मुंबईत रविवारी 123 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 43 कोविड रुग्ण दाखल आहेत, त्यापैकी 21 ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. रविवारी मुंबईत 17 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले.

मुंबईतील लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉ. व्ही. रविशंकर यांनी सांगितले की, त्यांनी कोविड रुग्णांसाठी 15 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड आणि आयसीयू तयार केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.