पुणे : शहरात मागील काही दिवसांपासून काेयता गँगने धुमाकूळ घातल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच एका जुन्या किरकाेळ वादातून टाेळक्याने 41 वर्षीय व्यक्तीच्या डाेक्यात आणि हातावर पालघनने वार कलेच्या प्रकार शिवाजीनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस भवनचे बाजूला घडला.
याप्रकरणी सतीश भीमा काळे (41, रा. शिवाजीनगर,पुणे) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार चार आराेपी विराेधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.
तुषार काकडे, माेन्या कुचेकर, दिपु शर्मा व दादया बगाडे (सर्व रा.हडपसर,पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहे. आराेपी दिपु शर्मा यास पोलिसांनी अटक केली असून ताे रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. हा प्रकार 16 जानेवारी राेजी रात्री पावणेएक वाजता घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी व तक्रारदार हे एकमेकांचे ओळखीचे असून त्यांच्यात चार महिन्यापूर्वी किरकाेळ कारणावरुन भांहणे झाली हाेती.त्यानंतर सदर भांडणे त्यांची आपसात मिटलेली हाेती. परंतु त्याचा राग मनात धरुन तक्रारदार सतिश काळे हे त्यांचे घरासमाेर झाेपलेले असताना, रात्रीच्या वेळी आराेपी त्याठिकाणी सशस्त्र आले. आराेपी तुषार काकडे व दिपु शर्मा यांनी काेयता हातात घेवुन ताे हवेत फिरवुन माेठमाेठयाने आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली. या दहशतीमुळे रस्त्याने जाणारे लाेक घाबरुन पळत हाेते. आराेपी दादया बगाडे याने त्याच्या हातातील पालघन हत्याराने काळे यांचे हातावर वार करुन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काळे यांनी त्यास मला का मारताे असे विचारले असता, त्याने दुसरा वार त्यांचे डाेक्यात करुन त्यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर सदर सर्व आराेपी माेटारसायकलवरुन पसार झाले. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. तरडे करत आहे.