‘राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, अवैध धंदे -जुगार, मटका, गुटखा विक्री राजरोसपणे सुरु’
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरुच
मुंबई : नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी त्रस्त आहे, हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगारआहे, महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे, राज्यातल्या महिला, मुली सुरक्षित नाहीत, दिवसा–ढवळ्या तलवरी, कोयते नाचवले जातआहेत, गोळीबार करुन दिवसाढवळ्या माणसे मारली जात आहेत, राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे, अशी राज्याचीस्थिती आहे. राज्यात डबल इंजिनचं सरकार आलं, विकासाचा वेग डबल होईल, म्हणून सांगितलं गेलं. मात्र राज्याच्या विकासाचा वेगडबल होण्याऐवजी गुन्ह्यांचा वेग डबल झाला आहे, असा आरोप करुन राज्यात केवळ सत्ताधारी सुरक्षित आहेत, सरकारकडून कणखरभूमीका न घेता केवळ सत्ता टिकविण्यासाठी तडजोडी सुरु आहेत, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
विरोधी पक्षनेते अजित पवार नियम 292 अन्वये विरोधी पक्षाच्यावतीने दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना म्हणाले, राज्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कोलमडली आहे. दिवसाढवळ्या गुंड गोळ्या घालून लोकांच्या हत्या करत आहेत. तलवारी, कोयते नाचवत रस्त्यावर फिरुन दहशत निर्माण करत आहेत. खून, दरोडे, अपहरण, हत्या, घरफोड्यांनी राज्यातले नागरीक हवालदिलझाले आहेत. जुगार, मटका, गुटखा, डान्स बार हे अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत. राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींवर, महिलाआमदारांवर हल्ले सुरु आहेत. धार्मिक वाद निर्माण करुन सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात पुन्हागँगस्टरनी डोके वर काढले आहे. व्यावसायिकांच्या हत्या होत आहेत. सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीडोकी फोडली जात आहेत.
कायदा–सुव्यवस्थेचे धिंडवडे…
पुण्यात कोयता गँगचा अजूनही पुरता बंदोबस्त झालेला नाही. कोयता गँगची दहशत वाढली आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुध्दाकोयता गँगने हातपाय पसरलेले आहेत. मुंबईतल्या नाहूरमध्ये दिवसा राजरोस तलवारी नाचवत गुंड फिरतात, हल्ले करतात. विशेषपोलीस आयुक्तांचं नवीन पद मिळाल्याने मुंबईतली गुंडगिरी कमी होईल, असं वाटलं होतं. उलट, आता तलवारी घेऊन, दिवसा राजरोसगुंड फिरत आहेत. सर्वसामान्यांना सुरक्षित वाटेल, व्यवसायिक आपले व्यवसाय करु शकतील, अशी परिस्थिती आज मुंबईत आहे का ? काही गुंडांना नुसती अटक करुन उपयोग नाही. याची पाळंमुळं खणून काढण्याची गरज आहे. सरकारने कोणालाही पाठीशी घालू नये.
नागपुरात खुलेआम हप्ताखोरी…
भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या घोषणा या सरकारने आतापर्यंत अनेकवेळा केल्या. परंतु उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये (Nagpur) खुलेआम हप्तेखोरी सुरु आहे. मोक्का दाखल असलेल्या दोन गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकातीलकर्मचाऱ्याने दीड पेटीची (दीड लाख) मागणी केली. पोलिस कर्मचारी व गुन्हेगाराच्या संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरलझाली आहे. या हप्ता खोरीला आळा घालण्याऐवजी ऐवजी पोलीस आयुक्तांनी विशेष पथक बरखास्त करुन टाकलं आहे. राज्यातखुलेआम हप्ताबाजी सुरु झाली आहे.
केंद्रीय अधिकारी बनून जनतेची लूट…
एका बाजूला तपास यंत्रणांनी देशभरात धुमाकूळ घातला आहे. याचाच फायदा गुन्हेगारही घेत आहेत. आता तोतया केंद्रीय अधिकारीबनून गुन्हेगार, व्यापाऱ्यांना लुटले जात आहे. कुठे आहे तुमची कायदा आणि सुव्यवस्था ? कोण सुरक्षित आहेत ? असा सवाल विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केला.
‘मिरज’च्या त्या प्रकरणात कोणतीही कारवाई नाही…
मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्याकडेची दुकाने पहाटे चार वाजता जेसीबी यंत्राच्या माध्यमातून उध्दवस्त करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचा भाऊ सहभागी होता. छोट्या व्यावसायिकांची 1 कोटी 13 लाख रुपयांची हानी झाली. पोलिसांच्या समक्ष हे पाडकाम झाले. परंतु पोलिसांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही. पन्नास वर्षापेक्षा जास्त जुनी ही दुकाने होती. पहाटे जेसीबी आणून दुकाने पाडण्यात आली. शंभर ते दीडशे लोकांचा जमाव हातात, लाठ्या, काठ्या, लोखंडी सळई यासारखी घातकहत्यारे घेऊन लोक येतात. तरीही पोलीसांनी काही कारवाई केली नाही. गुन्हा दाखल होऊनही आजपर्यंत कोणालाही या प्रकरणी अटककरण्यात आली नाही. सरकारच या मंडळींना पाठीशी घालत आहे.
अवैध धंदे राजरोसपणे सुरु…
राज्यात मटका, जुगार, गुटखा, डान्स बार यांना बंदी आहे. मात्र राज्यातल्या अनेक भागात हे सर्व धंदे राजरोसपणे सुरु आहेत. तसेचराज्यात ऑनलाईन लॉटरी, रमीचे प्रमाण वाढले आहे. या जुगारातून शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांची फसवणूक होत आहे. तसेच तरुण पिढी या ऑनलाईन रमीकडे वळत आहे. या ऑनलाईन रमीची जाहिरात काही अभिनेते, अभिनेत्र्या करत आहेत. त्यामुळेतरुण या जाळ्यात अडकत आहेत. यावर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
राज्यात डान्स बार सुरुच…
महाराष्ट्रात डान्स बार बंदी आहे. मात्र आज डान्सबारला राज्यात मोकळे रान मिळालेले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतरठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू आहेत. अधून मधून दाखवण्यासाठी समाजसेवा शाखेकडून धाडी टाकल्याजातात. पण डान्सबार सुरु आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर.आबांनी धाडसी निर्णय घेतला होता, त्याची कठोरअंमलबजावणी केली होती. त्याचधरतीवर आता कडक कारवाई करण्याची गरज आहे.
‘लव्ह जिहाद’वरुन सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न…
उत्तर प्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहाद विरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्ये काही लोकप्रतिनिधी करतआहेत. मात्र यातून धार्मिक द्वेश पसरला जाणार नाही, राज्यातल्या जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. सरकारने घटनाविरोधी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली आहे. जनतेच्या मूलभूत हक्क डावलण्याचा हा प्रकार आहे. लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कोणलाही अधिकार नाही.
सत्ताधाऱ्यांच्या संबंधित लोकच गोळीबाराच्या घटनेत…
सत्तारुढ पक्षाचे दादरमधील आमदारांनी गोळीबार केल्याचे प्रकरण राज्यात गाजले. या प्रकरणातील बॅलेस्टीक रिपोर्ट आला, ती गोळीआमदाराच्या बंदुकीतूनच सुटल्याचे स्पष्ट झाले. आता नवीनच माहिती पुढे आली की, अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केला. अज्ञातइसमाने गोळी झाडली असेल तर तो कोण होता, पोलिसांनी त्याचा तपास केला का ? सरळ सरळ आपल्या आमदारांना वाचवण्याचासत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. सरकार मनमानीपणे पोलीस दलाचा वापर करुन घेते आहे. सरकारमधील लोकप्रतिनिधीच गोळीबार करताम्हटल्या नंतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे धाडस वाढत आहे, गोळीबाराच्या अनेक घटना राज्यात घडल्या आहेत. राज्यात आता गँगस्टरनेपुन्हा डोके वर काढल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, हे या गोळीबारातून समोर येते. क्षुल्लक कारणावरुन ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. दोन स्थानिकांचा मृत्यू झाला, एकजण अत्यवस्थ आहे.