मुंबई : महाराष्ट्रातील नेत्यांच्या दिल्लीत फेऱ्या का होतात? असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार यांच्या दिल्ली दोऱ्यावरुन खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राज्यातील नेत्यांना दिल्लीत फायधूळ झाडावी लागत असल्याचे ते म्हणाले.
मंत्रिमंडळाचा विस्तार करणे म्हणजे असंतोषाचा भडका उठवणे असे होणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. काही लोक स्वत:हून गुलामगरी स्वीकारत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील खातेवाटपासंदर्भात रखडलेल्या निर्णयावर देखील त्यांनी टीका केली. अजित पवारांना अर्थखाते किंवा चांगले मंत्रिपद द्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
अजित पवार यांना दिल्लीतील नेत्यांनी चांगल्या खात्याचे आश्वासन दिले आहे. अजित पवार राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अनेक वर्ष चांगले काम केले आहे, त्याना कामाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना अर्थ किंवा एखादे चांगले मोठे खाते द्यावे लागणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.