मुंबई : उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती तसेच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या नीलमगोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
महिलांच्या प्रश्नावर तसेच इतर सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारा, स्वच्छ चेहरा, म्हणून नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणूनही त्यांना ओळखले जात होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर नीलम गोऱ्हे यासातत्याने ठाकरे गटाची बाजू मांडत होत्या. मात्र, आता नीलम गोऱ्हे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. राज्यातील राजकीयपार्श्वभूमीवर हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.
नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश करतानाच आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी गोऱ्हे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातीलशिंदे – फडणवीस सरकारवर विश्वास व्यक्त केला. राज्यात महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचेही त्याम्हणाल्या.
नीलम गोऱ्हे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यावर नाव न घेता टीका केली. सटरफटर लोकांमुळे मलानाराज होण्याचे कारण नव्हते. हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.