आयटीपार्क जवळील नेरे गावात सापडले बिबट्याचे बछडे

0

हिंजवडी  : जागतिक दर्जाच्या हिंजवडी आयटीपार्कच्या कुंपणावर गेली दोन वर्षे बिबट्यांची दहशत पसरली आहे . गेल्या वर्षी नेरे येथील शेतकऱ्याच्या दोन वासरांना बिबट्याने ठार केले तर  कासारसाईत  शेळ्या मेंढ्या सह पाच कोंबड्या फस्त केल्याची घटना ताजी असताना सोमवारी (दि  २४) सकाळी पुन्हा नेरे येथील उसाच्या फडात बिबट्याच्या मादी जातीचे तीन बछडे आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये  एकच खळबळ उडाली आहे.

नेरे गावातील शेतकरी मोहन जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी करताना विठ्ठल पालवे या कामागराला ही बछडी आढळली जाधव यांनी तात्काळ ही माहिती वनविभाला कळविली त्यानुसार घटनास्थळी पौड मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल मीरा केंद्रे, वनरक्षक पांडूरंग कोपणर यांच्यासह प्राणी मित्र शेखर जांभूळकर, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश सोरटे, राहुल जाधव, अनिमल रेस्क्यू टीम, चॉईल्ड अनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन, वन्यजीव रक्षक संघटेनेचे स्वयंसेवक दाखल झाले.

वन अधिकारी व रेस्क्यू टीमने ही बछडी ताब्यात घेतली असून लोकांची गर्दी टाळण्यासाठी वनपरीक्षेत्र कार्यालयात  अधिकाऱ्यांच्या निगराणीत ठेवण्यात आली आहेत. ही बछडे १५ दिवस ते महिनाभर वयाची असावीत असा अंदाज वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले या बछड्याना त्यांच्या आईची व मायेची गरज आहे तरच ते जगू शकतील.  त्यामुळे  जिथे बछडी सापडली  त्याच ठिकाणी ती पुन्हा सोडण्यात येणार आहेत.त्यामूळे बिबट्या मादी त्या बचड्यांना घेऊन जाईल. त्या मादीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात येणार असून  शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन ही वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.