‘एलआयसी’चा ‘आयपीओ’ या तारखेला होणार लॉंच; गुंतवणुकदारांसाठी कमाईची मोठी संधी..!

0

नवी दिल्ली : शेअर मार्केटमधील गुंतवणुकदारांसाठी महत्वाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांपासून गुंतवणुकदार एका ‘एलआयसी’च्या ‘आयपीओ’ची चातक पक्षासारखी वाट पाहत होते.. अखेर त्याची प्रतीक्षा संपली आहे.. या ‘आयपीओ’ची तारीख अखेर समोर आलीय. त्यानुसार येत्या 4 मे राेजी ‘एलआयसी’चा ‘आयपीओ’ लाॅंच केला जाणार आहे..

भारतीय आयुर्विमा महामंडळ.. अर्थात ‘एलआयसी’.. भारतातील सर्वात मोठी 66 वर्षे जूनी विमा कंपनी.. ‘एलआयसी’कडे 28 कोटींहून अधिक पॉलिसी असून, जगातील सर्वात मोठ्या 5 विमा कंपन्यांमध्ये तिचा समावेश होतो.. त्यामुळे ‘एलआयसी’चा ‘आयपीओ’ आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठा असणार असल्याची चर्चा आहे..

केंद्र सरकारने आपल्या मसुद्यात सुरुवातीला ‘एलआयसी’मधील 5 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर सरकारने 5 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांपर्यंत हिस्सा कमी केला. सरकार आता ‘एलआयसी’ (LIC)मधील 3.5 टक्के शेअर्स विकणार असून, त्यातून 21,000 कोटी रुपये मिळण्याची सरकारला अपेक्षा आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका
‘एलआयसी’ने गेल्या फेब्रुवारीमध्ये सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)कडे ‘ड्राफ्ट इश्यू डॉक्युमेंट’ दाखल केले होते. त्यावेळी सरकार या विमा कंपनीतील 5 टक्के स्टेक, म्हणजेच 316 कोटी शेअर्स विकणार असल्याचे सांगण्यात आले होते.. मात्र, नंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली. बदललेली परिस्थिती पाहून सरकारने इश्यूचा आकार 3.5 टक्क्यांपर्यंत खाली आणला.

मसुद्यानुसार, सरकारने यापूर्वी ‘एलआयसी’चे बाजारमूल्य सुमारे 17 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आता ‘एलआयसी’चे बाजार मूल्य 6 लाख कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले..

‘एलआयसी’ने ‘सेबी’कडे नवे कागदपत्रे दाखल न करता ‘एलआयसी आयपीओ’साठी सरकारकडे 12 मे पर्यंत वेळ मागितला होता. पण, आता 4 मे या तारखेवर शिक्कामोर्तब झालं असून, हा ‘आयपीओ’ 9 मे रोजी बंद होणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे गुंतवणुकदारांना कमाईची चांगली संधी यानिमित्ताने चालून आलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.