नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सातत्याने काहीना काही तरी कुरापती केल्या जात आहेत. पण आता पाकिस्तानने भारताविरोधात कोणतेही षडयंत्र रचले किंवा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताकडून पुन्हा एकदा लष्करी कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती अमेरिकेने जारी केलेल्या रिपोर्टमधून पुढे आली आहे.
भारताने यापूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली होती. त्यानंतर आता भारत पुन्हा एकदा अशाप्रकारची कारवाई करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत, पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करण्यास मागे हटणार नाही. अमेरिकेतील गुप्तचर विभागाने दिलेल्या रिपोर्टनुसार, भारताला पाकिस्तानने डिवचले तर लष्कराकडून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात पहिल्या कारवाईच्या तुलनेने अधिक चोख प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता जास्त आहे. तसेच भारत आणि चीन या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. या दोन्ही देशांत 2020 मध्ये वाद टोकाला गेला होता. यादरम्यान दोन्ही देशांतील सैन्यामध्ये कारवाईही झाली होती. 1975 नंतर पहिल्यांदा असे झाले होते. सध्या या दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेतले आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या कारवाई काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. काश्मीरमध्ये ऑपरेट करणाऱ्या अनेक मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यामुळे आता भारतीय लष्कराच्या मदतीने कारवाई करण्यास भारत तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.