लंडन : करोना विषाणुंच्या नव्या प्रकाराने ब्रिटनमध्ये आणखी करोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे करोनाच्या या नवीन प्रकारामुळे लंडन आणि आसपासच्या परिसरात पुन्हा बुधवारपासून लाॅकडाऊन घोषीत करण्यात आले आहे.
आरोग्य मंत्री मॅट हॅंकाॅक यांनी तेथील खासदारांना सूचना दिली आहे की, ”या भागात फक्त सात दिवसांमध्ये या घातक विषाणुमुळे करोना रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे त्वरीत निर्णायक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. करोनाचा हा नवीन प्रकार आढळला असून तो वेगाने पसरण्याचे कारण असू शकतो. या नवीन प्रकारातील १००० प्रकरणांची ओळख तज्ज्ञांकडून झालेली आहे”, हॅंकाॅक यांनी सांगितले.