महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले

0

सातारा : कोरोना, लॉकडाऊन आणि राज्यात कोसळत असलेला पाऊस यामुळे पर्यटकांची मुस्कटदाबी सुरु आहे. मात्र पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र यासाठी काही नियम आणि अटी लागू असल्याचे वाई प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

महाबळेश्वर, पाचगणीमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावरच होणार रॅपिड अॅन्टीजेन तपासणी होणार आहे. तर हॉटेल व्यावसायिक कर्मचारी यांना करावी लागणार प्रत्येकी दहा दिवसानंतर तपासणी होणार आहे. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना महाबळेश्वर पाचगणीत एन्ट्री दिली जाणार आहे. प्रांताधिकारी संगिता राजापुरे-चौगुले यांनी या संदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. आकडेवारी कमी झाल्यामुळे सातारा जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे. सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर हॉटेल 50 टक्केच्या क्षमतेने 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.