गुजरातचे मन संभाळण्यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान : थोरात

0

मुंबई : वेदांताफाॅक्सकाॅन प्रकल्प राज्याबाहेर जाणे ही बाब दुदैवी आहे. तेलंगणा, आंध्र महाराष्ट्र अशी तीन राज्य प्रकल्पासाठीस्पर्धेत होती. संबंधित कंपनीला तळेगाव जवळची जागाही मान्य होती, परंतु, मागील दोन ते तीन महिन्यात काय घडले? आता कारणेसांगण्यात अर्थ नाही, भाजपच्या ऑपरेशन लोटसमागे प्रकल्प वळवणे हा उद्देश असू शकतो, असा संशय माजी महसूल मंत्री काँग्रेसचेबाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

वेदांताफॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने, महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. त्यातच माजी मंत्री थोरात यांनीहाच धागा पकडून सरकारवर जोरदार टिका केली. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षीक सभेनिमित्त थोरात नगरलाआले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

थोरात म्हणाले, नवं सरकार येऊन अडीच महिने झाले आहेत, सरकार बेकायदेशीर आहे ? की कायदेशीर हे न्यायालयच ठरवणार आहे. सरकार हे जनतेसाठी असते, सरकार कायदेशीर ठरले तर या सरकारला दोन ते अडीच वर्षे काम करण्याची संधी मिळेल. त्यांचे दोनमहिने मंत्री मंडळ निर्णयात पुन्हा दोन महिने खातेवाटपात गेले. अद्याप जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत, एकीकडे 20 लाख हेक्टर क्षेत्राचेअतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. सरकार काहीही घोषणा करत असले, तरी प्रशासन मात्र ठप्प आहे. सरकारमध्ये गोंधळाची स्थितीआहे, ते पालकमंत्री नेमू शकत नाहीत. त्यांच्यातच मेळ नाही, असा त्याचा अर्थ आहे.

पालकमंत्री नेमले नाहीत, डीपीडीसीचा निधी यापूर्वी कधीच थांबवला नव्हता. वैदांता प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे, ही दुर्दैवी बाब आहे. कंपनीची महाराष्ट्रात येण्याची इच्छा होती, पण दोन ते तीन महिन्यात असे काय झाले ? सरकारने तीन महिन्यात काय केले ते सांगा ? तीन महिन्यात प्रकल्प गेला. सरकार आणण्यामागे, ऑपरेशन लोटस मागे, असे प्रकल्प पळवणे असाही उद्देश असू शकतो. आतागुजरातच्या पुढे जाऊ शकत नाही, गुजरातचे मन सांभाळण्यात महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. आपण आता फक्त दहिहंड्याफोडायच्या, अशी खरमरीत टिका थोरात यांनी सरकारवर केली.

थोरात म्हणाले, शासनप्रशासन म्हणून लक्ष नाही, त्यामुळे जनतेचे मोठे हाल होत आहेत. आता कुठे आहे सरकार ? असे विचारण्याचीवेळ आली आहे. बजेट व्हाईटबुकला टाकलेल्या रकमा थांबवल्या जात नाहीत. सरसकट विशेष करून विरोधी पक्षाच्याआमदारांच्या मतदार संघातील निधी थांबवणे हे दुर्दैवी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.