मास्क न घालणाऱ्यांना करोना रुग्णांची सेवा अनिवार्य : गुजरात उच्च न्यायालय

0

गुजरात : मास्क न घालणाऱ्यांसाठी गुजरात उच्च न्यालयाने वेगळी तरकीब काढली असून, मास्क न घालणाऱ्यांना दररोज चार ते पाच तास कोविड सेंटरमधील करोना रुग्णांची सेवा करावी लागणार आहे. पाच दिवसांचा हा सेवेचा कालावधी असणार आहे. गुजरात राज्य सरकारला या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश गुजरात उच्च न्यालयाने दिले आहेत.

गुजरात राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून गेल्या चोवीस तासांत १,४७७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. रूग्णांची वाढत चालेली संख्या आणि नागरिकांचा वाढलेला बेफिकिरपणा यामुळे गुजरात उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, देशातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या ९५ लाखांच्या घरात गेली आहे. मात्र देशातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर पोहचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चार डिसेंबरला देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.