टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे टेबल टेनिसमधील महिला एकेरीतील आव्हान संपूष्टात आल्या आहेत. स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्राला तिसऱ्या फेरीत ऑस्ट्रियाच्या खेळाडू सोफिया पोलकानोव्हाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने भारताचे आव्हानच संपले आहे.
त्यापूर्वी पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारी सुतीर्थ मुखर्जीही दुसऱ्या फेरीत पराभूत झाली होती. मनिकाने पोल्कोनोवाविरुद्ध अत्यंत सुमार खेळ केला. तीला या संपूर्ण लढतीत एकाग्रताच राखता आली नाही. तिला एकही गेम जिंकता आली नाही. पोल्कोनोव्हाकडून मनिकाला 11-8,11-2, 11-5, 11-7 असा पराभव पत्करावा लागला.
सुतिर्थाच्या पराभवानंतर भारताला मनिकाकडून मोठ्या आशा होत्या. मात्र, मानिकाने निराशा केली. त्यामुळे टेबल टेनिस महिला एकेरीत भारताचा पदकांचा प्रवास संपला आहे.
महिला पराभवानंतर भारताला आता पुरुष एकेरीवर आशा ठेवाव्या लागल्या आहेत. स्टार खेळाडू अचंथा शरथ कमालने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात त्याने पोर्तुगालच्या खेळाडूचा पराभव केला. शरथ कमालने 6 सामन्यात 4-2 च्या फरकाने सामना जिंकला.