नाशिक, मुंढेगाव एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; 35 कामगार जखमी

0

नाशिक : नवीन वर्ष स्वागताचे माहोल असतानाच नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. गेली 3 तास इथे स्फोट होत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

स्फोटानंतर आकाशात धुराचे व आगीचे लोट उठत असल्याचे दूरवरूनही पाहायला मिळत होते. आगी एवढी जास्त होती की, धूर सर्वत्र पसरला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व पोलिस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी त्या ठिकाणी तातडीने धाव घेतली.

आग लागलेल्या शाफ्ट जवळ अवघ्या 150 मीटर अंतरावर मोठी इंधन टॅंक आहे. या मोठ्या टाकीत, जवळपास 20 हजार डिझेल असल्याची माहिती समोर आली आहे. जिंदाल कंपनीतील डिझास्टर यंत्रणा माहिती असलेला एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील आपत्कालीन यंत्रणेचा, माहिती नसल्यानं अद्याप कोणताही उपयोग झाला नाही. प्रचंड धूर झाल्याने, बचावकार्यात प्रशासनाला अनेक अडचणी येत आहे.

या आगीमध्ये 35 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी आगीत कितीजण अडकले याबाबत नेमका आकडा समोर आलेला नाही. अग्निशमन दलाचे 8 बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात या कर्मचाऱ्यावर दोन कक्ष राखीव ठेवण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.