२६/११ च्या हल्ल्याच्या मास्टरमाईंडला १५ वर्षांची शिक्षा 

0

लाहोर ः २६/११ च्या हल्ल्याच्या मास्टर माईंड आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर जकीउर रहमान लखवीला पाकिस्तान कोर्टाकडून १५ वर्षांची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. मागील शनिवारी त्याला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती.

दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. २००८ साली मुंबईमधील २६/११ च्या हल्लाप्रकरणी २०१५ पासून तो जामीनावर होता. त्याला पाकिस्तानच्या दहशहवाद विरोधी विभागाने अटक केली आहे.

याबाबत पाकिस्तानी एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, “पंजाबच्या दहशतवाद विरोधी विभागाने दिलेल्या माहितीवर आधारित अभियानानंतर प्रतिबंधित संघटना लष्कर-ए-तोयबाचा कमांडर जकी उर रहमान लखवी याला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरविण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे”,  अशी माहिती पाकिस्तानच्या अधिकाऱ्याकडून दिली. त्याच्या अटकमागे जागतिक संघटन फायनॅन्शियल एक्शन टास्कफोर्स म्हणजेच एफएटीएपचा दबाव असल्याचेदेखील बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.