‘मौत का कुवा’…जालन्यात दोन दिवसात एका विहरीत दोन कार पडून चौघांचा मृत्यू

0

जालना : औरंगाबाद-देऊळगाव मार्गावर जात जामवाडी शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली. यामध्ये माय लेकीचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.दोनच दिवसांपूर्वी याच विहिरीत कार कोसळून दोन जणांचा मृत्यू झालेला आहे.

आरती गोपाल फांदडे (30) आणि माही गोपाल फांदडे (4 रा. सिंगडोह, ता. मानोरा, जि. वाशीम) असे मृत्यू झालेल्या माय-लिकींची नावे आहेत. तर गोपाल विठ्ठल फांदडे (35), वेदिका फांदडे (दीड वर्ष) आणि जय गुणवंत वानखेडे (17 रा. देवठाणा ता. मानोरा, जि. वाशीम) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील फांदडे कुटुंबीय रविवारी पहाटेच्या सुमारास एका कारमधून औरंगाबाद-देऊळगाव राजा मार्गावरुन जात होते. त्यांची कार जामवाडी शिवारात आली असता समोरुन अचानक एक ट्रक कारच्या दिशेने आला. यामुळे कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. यामध्ये माय लेकीचा जागीच मृत्यू झाला.

जखमी व्यक्तींना तातडीने जालना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी याच विहिरीत एक कार पडल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. रस्ता वळणदार असल्याने चालकाला वळणावर असलेली ही विहिर दिसत नाही. त्यामुळे हे अपघात झाले. वळणावर असलेली ही विहिर धोकादायक बनली असून अपघात रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.