‘माविआ’ची व्रजमूठ नव्हे तर व्रजझूठ : एकनाथ शिंदे

0

मुंबई : ”वज्रमुठ म्हणजे चांगले लोक एकत्र येतात. मविआची वज्रमुठ नव्हे तर वज्रझूट आहे. ते खोटारडे लोक सत्तेसाठी ते एकत्र आले आहेत. एकत्र आले आहेत. तीन तिघाडा काम बिघाडा अशी त्यांची स्थिती आहे. आम्ही विचारांसाठी एकत्र आलो आहोत. सत्तेसाठी त्यांनी विचार बाजूला ठेवले. महाविकास आघाडीकडून काय अपेक्षा ठेवणार? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केलाय ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रभू रामचंद्र आमच्या अस्मितेचा विषय असून 9 एप्रिलला आम्ही अयोध्येत जात आहोत. शरयू नदीवर आरती करीत आहोत. बाळासाहेबांचे आणि तमाम रामभक्तांचे अयोध्येत भव्य राममंदीर बनावे हे स्वप्न होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी महाराष्ट्राचा हात लागावा यासाठी सागवानी लाकडे आम्ही पाठवत आहोत.

एकनाथ शिंदे म्हणाले, प्रभूरामचंद्र आणि अयोध्येचे नाते जिव्हाळ्याचे आहे. प्रभू रामचंद्रांवरुन आम्ही कधीही राजकारण करीत नाही, बाकीच्यांचे काही सांगत नाही. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. कालपासून ही यात्रा सुरू झाली. सावरकरांनी हालअपेष्टा अंदमानात भोगल्या. इंग्रजांनी तेलाच्या घाण्याला त्यांना जुंपले. सावरकर राष्ट्भक्त

एकनाथ शिंदे म्हणाले, सावरकरांचा जो अपमान केला जात आहे, तो स्वातंत्र्यवीर, देशभक्तांचा देशासाठी शहिद झाले त्यांचा आणि तमाम देशवासीयांचा अपमान आहे. ज्या प्रवृती आहेत त्यांना सडेतोड आणि परखड उत्तर मिळायला हवे. स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रेत हजारो देशभक्त सहभागी होत आहेत. सावरकरांचा अपमान मनिशंकर अय्यर यांनी केला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी जोडा हातात घेत जोडे मारो आंदोलन केले होते. त्यांचेच पूत्र उद्धव ठाकरे सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहेत.

नाना पटोले मविआच्या सभेला गैरहजर आहेत यावर एकनाथ शिंदे म्हणाले, वज्रमुठ म्हणजे चांगले लोक एकत्र येतात ती असतात. हे तर वज्रझूट आहे. खोटारडी लोक एकत्र आले आहेत. तीन तिघाडा काम बिघाडा हे असे आहेत. सत्तेसाठी ते एकत्र आले. आम्ही विचारांसाठी एकत्र आलो आहोत. सत्तेसाठी त्यांनी विचार बाजूला ठेवले. महाविकास आघाडी कशासाठी झीले हे सर्वांनाच माहीत आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार.

Leave A Reply

Your email address will not be published.