पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात आज बैठक

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन  यांच्यात आज (दि. 11) आभासी माध्यमातून बैठक होणार आहे. भारत-अमेरिका चौथी मंत्रिस्तरीय बैठक लवकरच होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यात बैठक होत आहे.

दक्षिण आशियातील अलीकडील घडामोडी, हिंद – प्रशांत क्षेत्र आणि परस्पर हिताच्या जागतिक मुद्द्यांसंदर्भात सुरु असलेल्या द्विपक्षीय सहकार्याचा उभय नेते आढावा घेतील आणि विचारविनिमय करतील. द्विपक्षीय व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने, ही आभासी बैठक दोन्ही देशांची नियमित आणि उच्च-स्तरीय प्रतिबद्धता सुरू ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

उभय नेत्यांचा आभासी संवाद चौथ्या भारत-अमेरिका 2+2 मंत्रिस्तरीय बैठकीपूर्वी होत आहे, या मंत्रीस्तरीय बैठकीचे नेतृत्व भारताच्या बाजूने संरक्षण  मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि त्यांचे अमेरिकन समकक्ष, संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन आणि परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.