नवी दिल्ली : नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोन हिरे व्यापाऱ्यांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवले. कर्ज बुडवून दोघेही फरार झाले. यापैकी मेहुल चोक्सी याला डॉमिनिका या देशात स्थानिक पोलिसांच्या क्राइम ब्रँचने अटक केली आहे. तर नीरव मोदी इंग्लंडच्या जेलमध्ये आहे. नीरवला भारतात आणण्यासाठी इंग्लंडच्या कोर्टात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
मेहुल अँटिगुआ येथे लपल्याची माहिती भारताकडे होती. पण तीन दिवसांपूर्वी तो तिथून गायब झाल्याचे वृत्त आले. नीरव आणि मेहुल विरोधात इंटरपोलने भारताच्या मागणीनंतर रेड कॉर्नर नोटीस काढली होती.
I have spoken to his family, and they are happy and relieved that his whereabouts are now known. Efforts are being made to speak to him so that one can know the clearer picture of how he was taken to Dominica: Mehul Choksi’s lawyer Vijay Aggarwal to ANI
– ANI (@ANI) May 26, 2021