नाशिक : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाऊ. तसेच, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातच जामिनासाठी अर्ज करणार आहे, अशी माहिती या निकालानंतर आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
पोलिसांनी सध्या आमदार बच्चू कडू यांना नाशिक सत्र न्यायालयात हजर केले आहे. येथे जामिनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.