आमदार भालके अनंतात विलीन

0

पंढरपूर ः राष्ट्रवादीचे नेते आमदार भारत भालके यांच्यावर सरकोली गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पूत्र भगिरथ यांनी भारत भालके यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

रुबी हाॅस्पिटलमध्ये भारत भालके यांचे मध्यरात्री निधन झाले होते. यापूर्वी त्यांनी करोनावर मात केलेली होती. मात्र, त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुबी हाॅस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. गुरुवारपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर ही झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांचे निधन झाले.

आमदार भालके हे महाविकास आघाडीतील एक ज्येष्ठ नेते होते. सामान्यांमध्ये मिसळणारे आणि त्यांच्यासारखेच साधे वागणारे नेते होते. तीन निवडणुकीच वेगवेगळे चिन्हांवर ते निवडून आलेले होते.भालके यांच्या कुटुंबात आम्ही सर्व जण सहभागी आहोत, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्ती केली.

Leave A Reply

Your email address will not be published.