आमदार पडळकर यांच्या गाडीवर हल्ला; हल्लेखोर फरार

0

सोलापूर : भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना सोलापुरात रात्री 7.45 च्या सुमारास घडली आहे.

ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडलीय.

 

सोलापुरातील श्री शैल्य हक्क महादेव मंदिर इथं ही घटना घडली आहे. या दगडफेकीत पडळकर यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. मात्र, गाडीतील कुणालाही दगड लागला नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पडळकर एका कार्यक्रमासाठी आले होते. दरम्यान दुचाकीवर आलेल्याने त्यांच्या गाडीवर दगड मारुन हल्ला केला आणि पळून गेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.