अश्लील गाण्यांवर नाचणाऱ्या तरुणींवर सुरु होती पैश्यांची उधळण; पोलिसांनी टाकली धाड…
पुढे काय झाले वाचा सविस्तर...
सोलापूर : कोरोना आणि लॉकडाऊन सारख्या भीषण काळात हॉटेल मध्ये ‘डीजे’च्या तालावर नाचणाऱ्या तरुणींवर पैसे उधळणाऱ्या ‘डान्स बार’ हॉटेल पॅराडाइजवर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी २९ इसमांना ताब्यात घेऊन ४९ लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
चित्रपटाच्या गाण्यातील तालावर मद्यधुंद अवस्थेत नाचत मद्याचा घोट घेत असताना पोलिसांनी अचानक छापा टाकला. यामुळे अनेक आंबटशौकिनांची नशा तिथेच उतरली. काही आंबटशौकिन बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागले. पोलिसांनी सर्वांना तंबी देत एकाच ठिकाणी थांबण्यास सांगून त्यांच्यावर कारवाई केली.
हॉटेल पॅराडाइजमधील स्टेजवर आठ महिला अश्लील हावभाव करत नृत्य करत होत्या. तसेच काहीजण त्यांच्या अंगावर चलनी नोटा उडवून त्यांच्या अंगाला स्पर्श करत होते. यामुळे पोलिसांनी सर्व पुरुष व महिलांना ताब्यात घेतले. या छाप्यात ४८ लाख ९८ हजार ३३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, पोलिसांनी हॉटेल पॅराडाइजचा मालक बाबा जाफर पठाण हा त्याचे हस्तक संजय पोळ व मॅनेजर मुकेशसिंग बायस यांच्याकरवी हॉटेल पॅराडाइज ऑर्केस्ट्रा बार चालवत होता. त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
याप्रकरणी संजय पोळ (वय ४१), मुकेशसिंग बायस (वय ४७), अजिंक्य अशोक देशमुख (वय ३०), मयूर लक्ष्मण पवार (वय ३५), विजय शिवशंकर तिवारी (वय ४७), विशाल राजेंद्र कोळी (वय २६), नितीन अप्पासाहेब सासणे (वय ३४), गोपाळ बाबू जाधव (वय ४८), सुधाकर संदीपान माने (वय २७), श्रीकांत प्रल्हाद शिंदे (वय २२), आकाश गणेश कांबळे (वय २७), मारुती केत (वय ३७), रजनीश भोसले (वय ३४), सचिन सुरेश जाधव (वय ३५), अमर देविदास जमादार (वय २७), आकाश गुरव, दीपक सुंदरसिंग चव्हाण, प्रकाश वाघमारे, पुरुषोत्तम बने, अमिताभ वाघमारे, अजय शिवाजी धजाल, प्रसाद लोंढे, प्रवीणकुमार शिंदे, प्रशांत गायकवाड, प्रभाकर फताटे, राजकुमार उडचान, निसार मुजावर, संतोष कदम, गौस शेख व ८ नर्तिका यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.